संजय संगवई - लेख सूची

सुरांचा धर्म (२)

भारतीय संगीतपरंपरा, सूफी, हिंदू-मुस्लीम संबंध —————————————————————————– धार्मिक उन्मादाच्या आजच्या वातावरणात भारताची ‘गंगा-जमनी’ संस्कृती, सर्व धर्मीयांचा सामायिक वारसा म्हणजे काय हे नीट उलगडून दाखविणाऱ्या, मुस्लीम संगीतकारांनी व राज्यकर्त्यांनी भारतीय संगीताला नेमके काय योगदान दिले हे साधार नमूद करणाऱ्या करणाऱ्या लेखाचा हा उत्तरार्ध – —————————————————————————– इब्राहिम आदिलशाह अकबर बादशहाचा समकालीन होता. अकबर शेख सलीम चिश्तीचा भक्त होता. …

सुरांचा धर्म (१)

भारतीय संगीतपरंपरा, सूफी, हिंदू-मुस्लीम संबंध —————————————————————————– धार्मिक उन्मादाच्या आजच्या वातावरणात भारताची ‘गंगा-जमनी’ संस्कृती, सर्व धर्मियांचा सामायिक वारसा म्हणजे काय हे नीट उलगडून दाखविणारा हा लेख. भारतीय संगीताला मुस्लीम संगीतकारांनी व राज्यकर्त्यांनी नेमके काय योगदान दिले व सूफी परंपरेने भक्ती संप्रदायाशी नाते जोडीत कर्मठ धर्मपरंपरेविरुद्ध कसे बंड पुकारले हा इतिहास विषद करणाऱ्या लेखाचा हा पूर्वार्ध – …

नवा पर्यावरणवाद

नवा पर्यावरणवाद गेल्या काही दशकांत पर्यावरणीय जाणिवा अधिक प्रगल्भ झाल्या असून मानवी-सामाजिक जीवनाचा अधिक परिपूर्ण रीतीने विचार त्यातून पुढे आला आहे. शुद्ध हवा, पाण्याचे शुद्ध व निरंतर स्रोत, स्वच्छ सूर्यप्रकाश, नितळ आकाश वा चांदणे, या सृष्टीबद्दल वा इतर जीवांबद्दल प्रेम-कुतूहल, समृद्ध सांस्कृतिक- सामाजिक जीवन, जंगल-झाडे, प्राणी-पक्षी यांचे अस्तित्व या गोष्टी अधिक समृद्ध जीवनासाठी आवश्यक असतात. …

ज्ञानाची बहुलता

या चळवळींतून व विकासाच्या समीक्षेतून आजवरच्या वर्चस्ववादी ज्ञानविज्ञानावरही सवाल केले गेले आहेत व ज्ञानविज्ञानांचे बहुलवादी अस्तित्व ठसवले गेले. एका वर्गाचे ज्ञान किंवा अमुक प्रकारचेच विज्ञान यांना एकमेवाद्वितीय, प्रमाण मानण्याऐवजी प्रत्येक समाजघटकाचे व विभिन्न देशकालातील अनुभव व प्रयोगांनी सिद्ध होत आलेले ज्ञान-विज्ञान देखील महत्त्वाचे आहे, प्रमाण आहे, जी जाणीव अनेक चळवळी रुजवत आहेत. एखाद्याच वर्गाच्या, एकाच …

सम्यक जीवनशैली

या सर्वांना जोडून सामाजिक व व्यक्तिगत जीवनशैलीबद्दल आखणी करणे व धोरण असणे आवश्यक बनले आहे. जीवनशैलीचा मुद्दा उपभोगाशी, वस्तू व साधनसंपदेच्या वापराशी निगडित आहे. उपभोगवाद किंवा चंगळवाद हा मुद्दा व्यक्तिवादी नैतिकतेबरोबरच सामाजिक नीतीचा (सोशल मॉरॅलिटी), आपल्याशिवाय इतरांच्या लोकशाही हक्कांचा व साधनसंपत्तीविषयक धोरणांचा आहे. प्रत्येकाने किती पाणी, वीज, जंगल, नैसर्गिक साधनसपंत्ती वापरावी, इथपासून किती धन व …

संकोच स्थलकालाचा: आणखी कशाकशाचा?

दूरचित्रवाणी व संगणक–महाजाल प्रणालीने माध्यम व शिक्षण यात काय प्रगती/क्रांती केली त्याची वर्णने नव्याने करण्याची गरज नाही. ती गृहीत धरून, या माध्यमांच्या दुसऱ्या बाजूविषयी व एकंदरच संज्ञापन, ज्ञान, शिक्षण यांबद्दल आपण चिकित्सक व्हावे, त्यासाठी काही मुद्दे: शिक्षणाच्या दोन अंगांचा माध्यमांच्या दृष्टीने अधिक विचार होणे जरुरीचे आहे : मुलीचे, युवतीचे किंवा विद्यार्थिनीचे आकलन कसे घडत जाते; …